breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाणेर परिसरातील पूरग्रस्त भागांची पाहणी

बाणेर-बालेवाडी-सोमेश्वरवाडीतील नाल्यांना संरक्षक भिंत उभारा- चंद्रकांत पाटील

पुणे | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी भागातील पूरग्रस्त भागांची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागातील नाल्यांना संरक्षक भिंत नसल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण असून पुणे महापालिकेने सर्वेक्षण करुन नाल्यांना संरक्षक भिंत उभारण्याचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

यावेळी सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर, अभियंता दीपक लांडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय भोईर, अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा     –      ‘मला भ्रष्टाचाराचे सरदार बोलणाऱ्या अमित शाहांना सुप्रिम कोर्टाने तडीपार केलं होतं’; शरद पवारांचा पलटवार

चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरातील सोमेश्वरवाडी, बाणेर, बालेवाडी आदी भागात नाल्यांना संरक्षक भिंत नसल्याने सोसायटी भाग आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याची बाब नागरिकांनी निदर्शनास आणून दिली आहे. भविष्यात पुरपरिस्थिती टाळण्याकरीता पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रुंदी वाढविण्याबाबत सर्वेक्षण करावे. या कामी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, चंद्रकांत पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button