breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

४५ दिवसांत कुस्ती महासंघाच्या निवडणुका घ्या, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय

मुंबई : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाची निवडणूक पुढील ४५ दिवसांमध्ये घ्यावी असे इंडियन ऑलम्पिक असोसिएशनला सांगितले आहे. त्यामुळे पुढील ८ ते १० दिवसात कुस्ती महासंघाच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्यावर ७ महिला कुस्तीपटुंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवर मैदानावर कुस्तीपटुंचे आंदोलन सुरु आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवलं आहे. IOA चे सहसचिव कल्याण चौबे यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करून सर्व पदाधिकऱ्यांच्या प्रशासकीय, आर्थिक कामांवर बंदी घातली आहे.

हेही वाचा – ‘३० तारखेपर्यंत पुणे भाजपात मोठे बदल होणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

३ मे रोजी, IOA ने कुस्ती संघटना चालवण्यासाठी आणि ४५ दिवसांच्या आत निवडणुका घेण्यासाठी तीन सदस्यीय तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात वुशू फेडरेशनचे भूपेंद्र सिंग बाजवा, ऑलिम्पियन नेमबाज सुमा शिरूर आणि निवृत्त न्यायाधीश यांचा समावेश होता.

कुस्तीपटूंवरील लैंगिक शोषणाच्या आरोपांनी घेरलेले ब्रिजभूषण शरण सिंह यांनी WFI अध्यक्ष म्हणून ४ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. क्रीडा संहितेनुसार त्यांना आता या पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button