TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

स्वच्छ कारभार सुरक्षित मतदार हा नारा देत प्रचारास अपक्ष उमेदवार रविराज काळे यांची मुसंडी

पिंपरी: चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार राजू उर्फ रविराज बबन काळे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत असताना नारळ फोडण्याच्या प्रथेस बाजूला सारून नारळ न फोडता त्या जागी नारळाचे झाड लावून प्रचारास सुरुवात केली.

झाड लावण्याचे कारण असे की ते नारळाचे झाड जसजसे मोठे होत जाईल तसे त्याची आठवण देत राहिल की आपल्या प्रचारास सुरुवात केली होती.या प्रचाराची सुरुवात करताना वंटास चित्रपटाचे अभिनेते अजय वर्पे यांच्या हस्ते झाड लावून पिंपळे निलख परिसरात पायी पदयात्रा काढून प्रचार केला.पदयात्रेवेळी रविराज काळे यांचा असंख्य मित्र परिवार पदयात्रेत आपल्या मित्राचा प्रचार करण्यासाठी सहभागी झाले होते. या चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून या प्रश्नांना वाचा फोडून प्रश्न सोडविण्यासाठी मी आपल्यासमोर अपक्ष उमेदवार म्हणून कॅमेरा हे चिन्ह घेऊन निवडणूक लढत आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत आज सत्ताधारी आणि विरोधक बोलताना दिसत नाही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप निर्मिती आधुनिक दुष्काळामुळे 6500 हाउसिंग सोसायटी यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे सत्ताधारी भाजपाकडे कोणतीही ठोस जलनीती नसल्यामुळे शहरांमध्ये तीन नद्यांची इंद्रायणी पवना मुळा नैसर्गिक देणगी लाभलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपाच्या टँकर नीतीमुळे नदी उषाला कोरड घशाला या म्हणीचा प्रत्यय या टँकर नीतीमुळे येतो विविध प्रश्नांकडे उघड्या डोळ्याने पाहता या तिन्ही नद्यांना पडलेला जलपर्णीचा विळखा वाढत चाललेला मृत माशांचा खच आणि सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे नदी प्रदूषण ही सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट जलनीतीची देण आहे शहराच्या राजकारणाला शहराच्या समाजकारणाला पाच लाख मतदार संघ असलेल्या दूरदृष्टीचा अभाव निर्माण झाल्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये मेट्रो प्रकल्प आलाच नाही हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सर्वात मोठे अपयश आहे पडेल ते काम करायचे फक्त समोर येणारे प्रश्न सोडवायचे या वृत्तीमुळे सांगवी फाटा ते डांगे चौक या मार्गावर रोलर कोस्टर प्रमाणे ब्रिजची निर्मिती झाली का हा प्रश्न? उपस्थित होतो .या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करत स्वच्छ कारभार सुरक्षित मतदार चा नारा देत प्रचारात उसंडी मारली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button