ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

बदलापूर येथे झालेल्या लैगिक अत्याचार विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यावरील गुन्हे त्वरित मागे घ्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीव्र आंदोलन

पिंपरी चिंचवड : बदलापूर येथील आंदोलनकर्त्या वरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद चंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर वतीने पक्षाचे नेते माननीय अजितभाऊ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरअध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना युवक शहर अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “भिक्षा दे ग माई सीतेचे अपहरण करण्यासाठी साधू वेषात आलेल्या रावणाचे हे शब्द होते. आत्ताही तसेच घडत आहे. निवडणुकीच्या तोंडावर माता-बहिणींच्या मतांचे अपहरण करण्यासाठी तीन तोंडी रावण लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणत दारोदार भटकत आहे.मतांसाठी लाडकी बहिणचे नाटक नको तर बहिणीला सुरक्षा हवी आहे.बदलापूर चे आंदोलन राजिकिय होते आंदोलक हे बाहेरचे होते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची वकीली करण्यासारखे वाटले.तुम्ही न्याय मागणाऱ्या आंदोलकांवर राजकीय आंदोलन केल्याचा आरोप लावत असाल तर याचा दुसरा अर्थ हाच होतो.महायुती सरकारमध्ये जनरल डायरच्या औलादीचे लोक बसले आहेत बदलापूर मध्ये आंदोलन करणाऱ्या ३००० हजार लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यांना अटक केली, लाठीचार्ज केला.येत्या 24 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र आंदोलनात उतरणार आहे कुणाकुणाला अटक कराल असा सवाल त्यांनी सरकारला केला.सरकारने त्वरित आंदोलकावरील गुन्हे वापस घ्यावे अशी मागणी केली.

यावेळी बोलताना अजित गव्हाणे म्हणाले “महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकार यावर अंकुश ठेवण्यास अपयशी ठरले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर तसेच महायुतीचे नेते बदलापूर आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे असे सांगून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.बाहेरून आणलेल्या लोकांनी बदलापूर येथे आंदोलन केले.हा विरोधकांचा कट आहे.प्रकरण घडल 12 तारखेला.FIR झाली 18 तारखेला.इतक्या दिवस पोलिस प्रशासन आणि राज्य महिला आयोग झोपा काढत होते का..? की, 15 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलापूर दौऱ्यावर होते.त्यामुळे हे प्रकरण सरकारी दबाव आणून दाबण्यात आले का..? पिडीतेची तक्रार घेताना पोलीस प्रशासनाने 12 तास त्यांना पोलीस स्टेशनला बसवून घेतले.यावेळी राज्य महिला आयोगाला यात हस्तक्षेप करू वाटला नाही का..? एकीकडे तुम्ही म्हणता की,लाडकी बहिण योजनेला विरोध करण्यासाठी विरोधक याच भांडवल करत आहेत.अस असेल तर यापुढे राज्यात घडणाऱ्या कोणत्याच लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांवर विरोधकांनी काहीच बोलायचं नाही का..? सत्ता वाचविण्यासाठी तुम्ही अत्यंत असंवेदनशिलतेने वागत आहात,हे या राज्यातील जनता पाहत आहे.याच उत्तर तुम्हाला येत्या निवडणुकीत व्यवस्थित मिळेल यात काही आता शंका राहिली नाही,हे मात्र निश्चित. अशी टीका अजित गव्हाणे यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याचे मा. अजित भाऊ गव्हाणे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, शहर युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर,प्रदेश संघटक,संदीप चव्हाण,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष मयुर जाधव, प्रदेश सचिव के.डी. वाघमारे,प्रदेश सचिव ऍड.अमोल गव्हाणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर,माजी उपमहापौर विश्रांती ताई पाडाळे,माजी नगरसेविका प्रियंका बारसे,माजी नगरसेविका संगीता ताम्हणे,रेखाताई मोरे, कविता कोंडे,ओबीसी सेल विशाल जाधव,भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष ॲड.संतोष शिंदे,चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष मेघराज लोखंडे,राजेश हरगुडे, सचिन निंबाळकर,रजनीकांत गायकवाड, नियामत शेख,नितीन शिंदे,राजेश लष्करे,किरण दनाने,अनिल गायकवाड, सुधीर कांबळे,हनीफ अत्तार,शाहिद शेक,डॉ.विशाल धस,गणेश भांडवलकर, सार्थक बाराथे,शिवम केंगार,आदर्श बनसोडे, यश लोंढे,शाकिब शेख अवधूत कदम,जयेश गौरकर,शुभम सावरकर,आलोक गवळी,आशिष खत्री,दीप अंब्रे,शुभम सातपुते,कार्तिक कदम, साहिल भिंगारडे,देवांग भिंगारडे व इतर सर्व पदाधिकारी,सदस्य,तसेच पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button