Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

IAS Transfer : मोठी बातमी! 8 बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बदली, वाचा.. कुणाची कुठे नियुक्ती?

IAS Transfer : राज्यात नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाची चर्चा असून, एसआयटीकडून सखोल चौकशी केली जात आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठा उलटफेर झाला आहे. प्रशासनातील तब्बल 8 आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

या बदल्यावरुन अशोक खरात प्रकरणाचे प्रशासनातही पडसाद उमटताना दिसत आहेत. भोंदू खरातशी काही सरकारी अधिकार्‍यांचेही संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी खरातशी संबंध असल्याचा ठपका ठेवत उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

तसेच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (SRA) उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांना मंत्रालयातील महसूल व वन विभागात तात्काळ रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले. आता ज्या 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये राज्य प्रशासनातील जिल्हाधिकारी आणि आयुक्त पदावरील बड्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.

हेही वाचा –  IPL 2026 Live Streaming: IPLचे सामने फ्रीमध्ये कुठे पाहू शकता? थेट प्रक्षेपण आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती जाणून घ्या

एम. देवेंद्र सिंग यांची बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे सहआयुक्त म्हणून बदली

डॉ. मैनक घोष जिल्हा परिषद, धाराशिव, यांची सांगली येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

प्रियंवदा म्हाड्डळकर यांची जिल्हा परिषद, धाराशिव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

अशोक काकडे जिल्हाधिकारी, सांगली यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (एमएआयडीसी), मुंबई म्हणून नियुक्ती

राहुल रेखवार यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे सदस्य सचिव म्हणून बदली

श्वेता सिंघल विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांची व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई म्हणून नियुक्ती

रुबल प्रखेर अग्रवाल व्यवस्थापकीय संचालक, महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई यांची विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई म्हणून बदली.

नयना गुंडे महिला व बाल आयुक्त, पुणे यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून बदली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button