Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, माझं..’; मनोज जरांगे पाटील यांचं प्रकृतीबाबत मोठं विधान!

Manoj Jarange Patil | लासलगावमध्ये मराठा समाजातील लोकांसमोर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी यंदाच्या निवडणुकीसंदर्भातील त्यांच्या भूमिकेबाबत भाष्य केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत केलेलं विधान कार्यकर्त्यांची चिंता वाढवणारं ठरलं आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. मी कधी जाईल माहित नाही, मी तुमच्यात किती दिवस राहील, माहीत नाही, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, की मी तुमचा थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे. माझं शरीर मला साथ देत नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. माझ्या समाजाचा लढा अर्धवट राहू नये, माझा समाज आरक्षणापासून लांब राहू नये, अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा     –      मिशन विधानसभा : ‘निवडणूक अजेंडा’ महाविकास आघाडीपेक्षा महायुती ‘पॉवर फुल’ 

मला दर ८-१५ दिवसांनी सलाईन लावावी लागते. मी तुम्हाला आधीपासूनच सांगतोय. कारण हे शरीर आहे. कधी जाईल माहिती नाही. मी तुमच्यात किती दिवस राहीन हे मलाही सांगता येत नाही. माझं शरीर कधी धोका देईल सांगता येत नाही. मी उपोषणं केली आहेत. त्या उपोषणांमुळे मला चालताना, उतरताना-चढतानाही त्रास होतो, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी भाष्य केलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button