Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘आता विधानसभा निवडणूक लढवणार नाही’;भाजप आमदाराची मोठी घोषणा

Maharashtra Politics : परतूरचे भाजप आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. “मी म्हातारा झालो नाही, पण इथून पुढे विधानसभा निवडणूक लढवणार नाही. आता पोरगं वेटिंगवर आहे,” असं स्पष्ट वक्तव्य लोणीकर यांनी केले.

लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त जालन्यातील वाटूर येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांची लाडू तुला करण्यात आली.

याच व्यासपीठावरून बोलताना त्यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत देत तरुणांना संधी देण्याची वेळ आल्याचे म्हटले. “मी थकलो नाही, पण आता नव्या पिढीला संधी मिळाली पाहिजे. माझे चिरंजीव निवडणुकीसाठी सज्ज आहेत,” असं म्हणत त्यांनी मुलासाठी जागा मोकळी करण्याचा इशारा दिला.

हेही वाचा –  पुणे विमानतळावरून दुबई-अबू धाबी विमान सेवा युद्धजन्य परिस्थितीमुळे रद्द

विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले असले तरी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “पक्षाने संधी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार आहे,” असं सांगत त्यांनी केंद्राच्या राजकारणात जाण्याची इच्छा व्यक्त केली.

परतूर विधानसभा मतदारसंघात लोणीकर यांची मजबूत पकड आहे. मात्र, त्यांनी स्वेच्छेने माघार घेतल्यास त्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाचा उदय होण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानामुळे जालना जिल्ह्याच्या राजकारणात पुढील काळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button