Indrayani Thadi-2023 : ‘इंद्रायणी थडी’ महोत्सवात एक हजार पेक्षा जास्त स्टॉलची नोदणी प्रक्रिया पूर्ण
![Registration process of more than one thousand stalls completed in 'Indrayani Thadi' festival](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/indrayani-thadi-2023-2-780x470.jpg)
भोसरी : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील गावजत्रा मैदानावर दि. २५ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘इंद्रायणी थडी-२०२३’ महोत्सव आयोजित केला आहे.
या महोत्सवात प्रवेश द्वाराच्या सुरुवातीला अयोध्येतील श्री राम मंदिर पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर तब्बल १७ एकर जागेत संपूर्ण महाराष्ट्रातील १ हजार स्टॉल उभारण्यात आले आहेत. या मध्ये प्रत्येक स्टॉल ची नोंदणी प्रक्रिया आज पार पडली. या महोत्सवात एक हजार पेक्षा जास्त स्टॉल मोफत देण्यात आले आहेत. स्टॉल मोफत असल्याने महाराष्ट्रभरातून लोकांनी या महोत्ववासाठी नोदणी केली आहे. स्टॉल नोंदणीसाठीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. स्टॉल मध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध खाद्य पदार्थ, कपडे, बुट, शालेय साहित्य, पुस्तके इत्यादी वस्तू खरेदीसाठी उद्यापासून सज्ज असणार आहेत.
या महोत्सवात खाद्यसंस्कृती, ग्रामसंस्कृती, हस्तकला, अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिराची प्रतिकृती, ग्रामसंस्कृती, पाटील वाडा, विनोदी मेळा, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, मुलांचा मेळा, मॅजिक शो, फॅशन शो, नृत्य स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. गेले आहे. यंदा येथे एक हजारांहून अधिक स्टॉल्स उभारले जात आहेत. महोत्वसाठीच्या स्टॉसाठीची नोंदणी गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होती. आज नोंदणी साठीचा शेवटचा दिवस होता. आज ही स्टॉल नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/image-19-1024x576.png)