breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘हिंदू जननायक’ राज ठाकरे, औरंगाबाद सभेसाठी लागलेल्या बॅनरची राजकीय चर्चा

औरंगाबाद |

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली असून, त्यानुसार तयारी सुद्धा केली आहे. तर या सभेला अवघ्या चार दिवसांचा कालावधी उरला असताना मनसेकडून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर सभेच्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आत्तापासूनच होर्डिंग लावण्यात येत आहे.

शहरातील निराला बाजार परिसरातील मुख्य चौकातसुद्धा एक बॅनर लावण्यात आले असून, त्यावर ‘राज तिलक की करो तैयारी, आ रहे है भगवा धारी’ असं लिहण्यात आले आहे. तर सोबतच ‘जागर हिंदुत्वाचा ऐतिहासिक राज सभेचे साक्षीदार व्हा’ असे आवाहन सुद्धा या बॅनरवरून करण्यात आले आहे. सोबतच राज ठाकरे यांचा ‘हिंदू जननायक’ असाही उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. तर असेच बॅनर शहरभरात लावण्यात आले आहे.

raj Thackeray news

सभेची तयारी सुरू…

दरम्यान, राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेची मनसेकडून जोरदार तयारी सुरू आहे. आजपासून सभेच्या ठिकाणी असणाऱ्या व्यासपीठाचे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर मनसे नेते बाळा नांदगावकर हे सुध्दा आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर असणार असून, यावेळी त्यांच्या उपस्थित सभेच्या तयारीबाबत आढावा बैठक सुद्धा होणार आहे. तसेच नांदगावकर हे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन परवानगीबाबत चर्चा सुद्धा करणार असल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button