breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

रात्री गाडी घेऊन निघाला तो परतलाच नाही, रत्नागिरीत क्रीडा शिक्षकाची अपघाती एक्झिट

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात एका तरुण क्रीडा शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ओंकार उदय बाणे (वय वर्षे ३०) असे या शिक्षकाचे नाव आहे. मात्र, हा अपघात नेमका कशामुळे याची अद्याप माहिती नाही. म्हैस किंवा गाडी आडवी आल्याने हा दुर्देवी अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. पण, ओंकारच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण रत्नागिरी शहरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच शेकडोंच्या संख्येने तरुण वर्गाने शासकीय रुग्णालयात धाव घेतली.

शहरातील चंपक मैदानाच्या समोर असलेल्या फर्निचर दुकानासमोर हा अपघात झाला. या रस्त्यावर गुरंं आडवी आल्याने या पूर्वीही खूप अपघात झाले आहेत. हा रस्ता अपघाती रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान, हा अपघात झाला तेव्हा ओंकारने हेल्मेट घातले नव्हते, जर घातले असते तर मेंदुला सरळ मार लागला नसता आणि कदाचित तो वाचू शकला असता.

गाडी घेऊन गेला, आली ती मृत्यूची बातमी

सोमवारी (६ जून) रात्री उशिरा सव्वा अकरा वाजता हा अपघात झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये ओंकार बाणेचा जागीच मृत्यू झाला. ओंकार उदय बाणे हा गोगटे जोगळेकर कॉलेजमध्ये गेल्या ६ वर्षांपासून क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होता. सोमवारी रात्री साडे दहा वाजेपर्यंत तो गावातच मुलांच्या बरोबर बसलेला होता. पण, नंतर तो कशासाठी गाडी घेऊन निघून गेला हे कोणालाच समजले नाही. नंतर थेट हा अपघात झाल्याची बातमी कळली आणि सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अपघातावेळी ओंकारकडे जिमची बॅग होती. रत्नागिरी परटवणे रोड मार्गे उद्यम नगरच्या रस्त्याने तो येत होता. याचवेळी म्हैस किंवा गाडी आडवी आल्याने हा दुर्देवी अपघात होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. अपघातात जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जर त्याला तात्काळ मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचू शकला असता, असंही बोललं जात आहे.

खो-खो, कबड्डी, क्रिकेट या खेळात निपुण

ओंकार हा अतिशय उमद, सगळ्यांना मदत करणारा होते. तो खो-खो, कबड्डी, क्रिकेट या खेळात निपुण होता. ओंकार हा जरी क्रीडा शिक्षक असला तरी तो सगळ्यांना स्पर्धेच्या वेळी खूप मदत करायचा. त्याच्या सहकार्याने रत्नागिरीमध्ये गावोगावी अनेक जण स्पर्धा आयोजित करत होते.

गुरंं आडवी आल्याने यापूर्वीही अनेक अपघात

चंपक मैदानाच्या समोर असलेल्या फर्निचर दुकाना समोर हा अपघात झाला. या रस्त्यावर गुरं आडवी आल्याने यापूर्वीही खूप अपघात झाले आहेत. हा अपघाती रस्ता म्हणून प्रसिद्ध आहे. रात्री आठनंतर या रस्त्यावर जागृत नागरिक प्रवास करण्याचे टाळतात. या रस्त्यावर अजिबात लाईट नाही, ती लावण्यासाठी शिरगाव ग्रामपंचायतीने तात्काळ प्रयत्न करणे आवश्यक आहे. वास्तविक एमआयडीसीनेही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. फिनोलेक्स कंपनीची वसाहत इथेच आहे. या रस्त्यावर विजेचे दिवे असणे खूप महत्वाचे आहेत. परिसरात गुरंं बाळगणारे लोक आपली गुरंं चंपक मैदानात सोडून देतात. रात्रीची त्यांना घरी घेऊन जात नाहीत. त्यामुळे ही गुरंं रात्रभर त्या रस्त्यावरच फिरत असतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button