हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला
![Hasan Mushrif's pre-arrest bail application rejected by the court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/hasan-mushrif-1-780x470.jpg)
मुंबई : ईडीकडून दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पीएमएलए कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यावर आता ईडीच्या अटकेची टांगती तलवार आहे.
भागदार शेतकऱ्यांची फसवणूक आणि मोठा आर्थइक घोटाळ्याचे मुश्रीफ सूत्रधार असल्याचा दावा ईडीने केला होता. ईडीचा हा युक्तीवाद कोर्टाने मान्य केला आहे. विशेष म्हणजे पीएमएलए कोर्टाने हा निर्णय दिला आहे.
हसन मुश्रीफ यांची मुलं साजिद, आबिद आणि नावेद या तिघांसह सीए महेश गुरव यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. हसन मुश्रीफ यांनी शेअर सर्टिफिकेटचं अमिष दाखवून शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले. मात्र ते पैसे मुश्रीफ यांच्या मुलांच्या नावे असलेल्या कंपन्यांच्या खात्यात वळते केले, यावरून हा शेड्युल गुन्हा असल्याचं सरळसरळ स्पष्ट होतं, असा दावा ईडीने न्यायालयात केला आहे.