‘एका घटनेमुळे जयंत पाटीलांनी आमच्यासोबत शपथ घेतली नाही’; अजित पवार गटातील नेत्यांचं विधान
![Hasan Mushrif said that Jayant Patil did not take oath with us due to an incident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Jayant-Patil-3-780x470.jpg)
मुंबई : अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. मात्र जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं. जयंत पाटील हे अजित पवार गटाबरोबर जाण्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. दरम्यान, यावरून अजित पवार गटातील नेते हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, जयंत पाटील यांनीही आमच्याबरोबर शपथ घेतली असती. आता मी इतिहास सांगत बसत नाही. ते गोपनीय आहे. मात्र, आज आम्ही ज्या पक्षाबरोबर गेलो आहे त्याच्याशी इमान ठेवणं आणि त्यांच्यासाठी जीवाचं रान करणं हा माझा स्वभाव आहे. आता आम्ही भूमिका बदलली आहे. त्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे.
हेही वाचा – महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी
जयंत पाटील एका घटनेमुळे तिकडे थांबले. ती घटना मी माध्यमांना सांगणार नाही. ती घटना मी नंतर कधीतरी सांगेन. कारण मी नीतीमुल्ये पाळणारा माणूस आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.