Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

हर्षवर्धन पाटलाचं ठरलं! शरद पवारांच्या भेटीनंतर मुलाच्या स्टेटसवर ‘तुतारी’

पुणे | आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून सुरू असतानाच माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा रंगली. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी व्हाट्सअपला तुतारीचे स्टेटस ठेवले आहे.

हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात जवळपास १ तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील सुद्धा उपस्थित होत्या. त्यानंतर त्याचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी व्हाट्सअपला तुतारीचे स्टेटस ठेवले असल्याने चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा     –    महिला व मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने बारामती तालुक्यात ‘शक्ती अभियान’ राबविणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. अंकिता पाटील या पुणे जिल्हा भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. अंकिता पाटील लवकरच या पदाचा राजीनामा देणार अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button