breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
‘मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही तो निर्णय घेतला’; गुलाबराव पाटीलांच वक्तव्य
![Gulabrao Patil said that we took that decision by betting on the post of minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Gulabrao-Patil-780x470.jpg)
मुंबई : मंत्री पदाचा सट्टा लाऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जाण्याचा निर्णय घेतला असं खळबळजनक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भोरखेडा येथे केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उधाण आल आहे.
शिवसेनेतून बाहेर पडण्यापूर्वी उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात असल्याचं होतं. मात्र, संजय राऊत यांनी जायचं तर जा असं म्हणाले. त्यामुळे मंत्री पदाचा विचार न करता बाळासाहेबांचे विचार घेऊन जात असलेल्या एकनाथ शिंदेंच्या मागे जाण्याचा निर्णय घेतला, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
सत्तेचा प्रयोग फसला असता तरीदेखील मी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असता. नागपूरपासून ते दादरपर्यंत सर्व गेले. त्यामुळे मी एकटा राहिलो असतो तर मतदारसंघात विकास करू शकलो नसतो, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.