गुलाबराव पाटलांकडून अजित पवारांचं तोंडभरून कौतुक, म्हणाले अजित दादा म्हणजे..
संजय राऊत काही स्फोट करत नाहीत, त्यांचे स्फोट टिकली-टिकली
नागपुर : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांची शिंदे गटातील आमदाराने तोंडभरून कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. अजितदादा पवार म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व आहे. त्यांचा एक गुण साऱ्यांनाच आवडतो. त्यांचा या गुणाचं सभागृहातही कौतुक होतं..,असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांचं कौतुक केलं आहे.
अजितदादा पवार हा नेता पैलू आहे. चुकलं तर अजितदादा तोंडावर बोलतात. म्हणून ते सभागृहात सगळ्यांना आवडतात. अजित पवार सत्तेत असो किंवा विरोधीपक्षात तरी ते नेहमी योग्य गोष्टींच्या पाठिशी उभे राहतात. महाविकास आघाडीमध्ये अजितदादांना विचारात घेतलं जात नाहीये. त्यामुळे विरोधी पक्षाचा आपल्या नेत्यावर विश्वास नाही, असं दिसतंय. उद्या सभागृहामध्ये काही चढाओढ झाली तर त्यांनाच विचारता अंधेरी रात में कार्यक्रम सुरू होईल, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
संजय राऊत काही स्फोट करत नाहीत राव… त्यांचे स्फोट टिकली-टिकली… त्यांच्याकडे काही नाहीये, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला.
सोबतच, उत्तर महाराष्ट्र विदर्भ असेल सिंचन प्रकल्प असेल. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15, 000 मदत मिळेल. विदर्भा ज्या करता लागणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कामकाजाकडे लक्ष टाकलं तर शंभर लक्षवेधी नऊ दिवसात होतात. प्रश्न उत्तराचा तास रेगुलर होतोय. त्यामुळे विरोधकांचे आरोप चुकीचे आहेत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.