breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

कात्रज परिसरात आढळराव पाटील यांना वाढता पाठिंबा

स्थानिक लोकप्रतिनिधींसह नागरिकांशी आढळराव पाटील यांनी साधला संवाद

पिंपरी | प्रतिनिधी

प्रचाराची रणधुमाळी वाढलेली आहे. प्रचार सांभाळत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेटीगाठींचे सत्र देखील सुरूच ठेवले आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ठ असणाऱ्या कात्रज गावठाण व संतोषनगर, कोंढवा, सुखसागर नगर, कौसरबाग आदी ठिकाणी जाऊन मतदारांसह महायुतीच्या विविध पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवक यांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधला. या परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले.

शिरूर लोकसभेत गतवेळी झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी माजी खासदार आढळराव पाटील यांनी चंग बांधला आहे. गतवेळच्या निवडणूक निकालापासून त्यांनी जनतेशी थेट कनेक्टिव्हिटी ठेवला होता. या उलट विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. कोल्हे यांचा संपर्क कमी झाल्याची तक्रार त्यांच्याच पक्षाचे लोक करत होते. त्यामुळे यंदाची निवडणूक आढळरावांसाठी सोपी ठरेल असे भाकीत अनेक राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मात्र बेफिकीर न राहता प्रचारात देखील आढळराव मुसंडी मारताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कात्रजसह आजूबाजूच्या परिसरात भेट देऊन मतदारांशी नाळ जोडण्याचा घट्ट प्रयत्न केला.

हेही वाचा     –      मतदार जागृतीसाठी आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन 

या भेटीदरम्यान आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या वेळेला अपघाताने माझा पराभव झाला, पण पुन्हा मी निवडणूक लढवत आहे. तीनदा प्रत्येकवेळी वाढत्या मताधिक्याने विजयी झालो. यावेळी पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होणार, असा आत्मविश्वास महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. विद्यमान खासदार मतदारसंघात फिरकले नाहीत. एक रुपयांचा निधी आणला नाही, लोकांचे फोन घेतले नाहीत. आता मात्र संजय राऊतांसारखी सकाळी माईकसमोर बडबड करत आहेत, त्यांचे या निवडणुकीत माझ्यासमोर आव्हान नाही, अशी खरमरीत टीका आढळराव पाटील यांनी केली.

स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठिंबा

माजी खासदार आढळराव पाटील यांच्या भेटीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींची मोठी उपस्थिती या वेळी पाहायला मिळाली. या वेळी हडपसरचे आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अजय साचले, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, कार्याध्यक्ष संदीप बधे, भाजपा नेत्या सुरेखा कळसे, मनसे नेते बाबू वागस्क, भाजपा पुणे शहर माजी उपाध्यक्ष संजय कपिले, माजी नगरसेविका कल्पना धोरवे, विकास फाटे, मनसे प्रवक्ते योगेश खैरे, भीमराव पाटे, माजी नगरसेवक कदम, कोंढव्यात मनसे हडपसर विधानसभा अध्यक्ष अमोल शिरस, उपविभाग अध्यक्ष सतीश शिंदे, सेना प्रमुख सुमित कटारिया, अमित लोणकर यांच्याशी संवाद साधला. महायुतीतील विविध घटक पक्षाच्या विविध पदाविकार्यापैकी अभिमन्यू भानगिरे, स्मिती बडदे, मोनिका काळे, राजू अडागळे, प्रवीण जगताप, संजय लोणकर आदी उपस्थित होते. नगरसेवक गफूर पठाण, नंदाताई लोणकर यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या. कौसरबाग येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष चांद मनोरे, युवक अध्यक्ष अब्दुल हफिस, प्रदेश जनरल सेक्रेटरी शुबान कुरेशी, उपाध्यक्ष अनवर रंगरेज, उपाध्यक्ष हासिफ शेख, एम तोफिक शेख, युनूस अन्सारी आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींचा वाढता पाठिंबा आढळरावांना सकारात्मक ठरेल असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button