breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

Ground Report । भोसरीच्या भावी आमदारांसाठी खासदार अमोल कोल्हेंचा ‘‘जनता दरबार’’

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे ‘फायर मोड’वर : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये लोकांचे प्रश्न सोडवणार

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील तीनही मतदार संघात महायुतीला शह देण्याची रणनिती आखली असून, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि स्थानिक इच्छुकांनी जनसंपर्क वाढवला आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या प्रबळ दावेदार सुलभा उबाळे यांनी ‘‘ भोसरीमध्ये यंदा मशाल पेटवू, रुतलेल्या विकासाला नवदिशा देऊ’’ असा संकल्प सोडला आहे. त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची साथ मिळाली आहे.

सर्वसमान्यांचा दबलेला आवाज सरकार पर्यंत पोहोचविण्यासाठी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी जनता दरबारचे आयोजन केले आहे. आपण सर्वांनी त्यास जास्तीत- जास्त उपस्थित रहात आपल्या समस्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोशी येथील साधूराम मंगल कार्यालय येथे गुरूवार, दि. १८ जुलै रोजी दुपारी १२.३० ते ३.३० दरम्यान हा जनता दरबार होणार आहे. या जनता दरबारमध्ये उत्पन्नाचा दाखला मिळत नाही?, तलाठी, तहसीलदार अडवणूक करतात ? महा-ई-सेवा केंद्र पैसे लुबाडतात ? पोलीस तुमचे ऐकत नाही ? रस्ता उखडला आहे ? घरासमोर कचरा साठलाय? चेंबरच्या दुर्गंधीने हैराण झालाय ? अधिकारी जुमानत नाही ? रेशन कार्डसाठी पैसे मोजावे लागतात ? मनमानी लाईट बिलांना वैतागलात ? ट्राफिकच्या समस्येने त्रस्त आहात? असे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा दावा करण्यात आला आहे.

महायुतीमधील बंडखोरांची अडचण…

लोकसभा निवडणुकीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा मोशीमध्ये जाहीर सत्कार झाला. राष्ट्रवादीत ‘इनकमिंग’ वाढले असून, आता भोसरीतील इच्छुकांनी पक्षाकडे रांग लागली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने दरम्यानच्या काळात बैठक घेतली आणि ‘‘‘मशाल’ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराचेच काम करणार…’’ असा आक्रमक पवित्रा घेतला. यासह निष्ठावंत उमेदवाराला संधी द्यावी आणि संधीसाधू लोकांना दूर ठेवावे, असा आग्रह धरला जात आहे. परिणामी, ‘‘भावी आमदार हा महाविकास आघाडीचा असेल’’ अशी भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी घेतली होती. सर्व घडामोडी पाहता, राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा भाजपातून महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेल्या इच्छुकांची पुरती अडचण झाली आहे.

सुलभा उबाळे महाविकास आघाडीच्या उमेदवार!

विधानसभा निवडणूका दोन महिन्यांवर आल्या असताना शिवसेना ठाकरे गटाच्या माजी विरोधी पक्षनेत्या तथा जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी मतदार संघातील प्रश्नांवर आवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. तसेच, आक्रमपणे लोकांपर्यंत पाहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीची संधी सुलभा उबाळे यांना मिळेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button