breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

Ground Report । निष्ठावंत तुषार कामठे- सुलक्षणा धर यांनी ‘करुन दाखवले’ ; साहेबांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये स्थान मिळवले! 

बलाढ्य दादा गटासमोर साहेबांच्या राष्ट्रवादीला ‘स्ट्रॉग लीडरशीप’ : पिंपरी विधानसभेसाठी शक्तीप्रदर्शन अन्‌ शहरातील दबदबा कायम 

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची ‘‘विजयी संकल्प सभा’’ झाली. ही सभा यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष तुषार कामठे आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांनी पुढाकार घेतला. किंबहुना, पिंपरी विधानसभा क्षेत्रात सभा आणि शक्तीप्रदर्शन करीत विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली आहे. पक्षाची संघटनात्मक धुरा घेतल्यापासून ‘‘निष्ठावंत’’ म्हणून त्यांनी घेतलेल्या परिश्रमाची दखल थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे कामठे आणि शिलवंत यांनी ‘करुन दाखवले’ आणि साहेबांच्या ‘गुड बॉक्स’मध्ये स्थान मिळवले, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.  

दि. २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला शहराध्यक्षसुद्धा मिळणार नाही, अशी स्थिती होती. त्या काळात पुरोगामी विचार आणि निष्ठा या मुद्यावर माजी नगरसेवक तुषार कामठे आणि सुलक्षणा शिलवंत धर यांनी पवार साहेबांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा राजकीय व व्यावसायिक जीवनात फटका बसलेला असतानाही, या दोघांनी संघर्षाची भूमिका घेतली. 

सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत तुषार कामठे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षाच्या शहराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाल्यानंतर तुषार कामठे यांनी सर्वप्रथम पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रमुख विरोधी पक्ष भाजपाच्या तोडीस तोड अध्ययावत मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय उभारले. त्याचे लोकार्पण करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या दिग्गज नेत्यांना निमंत्रित करण्यात आले. पक्ष कार्यालयाच्या लोकार्पणाला जाहीर सभा घेण्याचे धाडस कामठे- शिलवंत जोडीने दाखवले. त्यानंतर आमदार रोहीत पवार यांची ‘जनसंवाद सभा’ असो किंवा पक्षाचा कोणताही कार्यक्रम असो शहरातील मोजक्या लोकांच्या साथीने पुढाकार घेतला. पक्षाचे आंदोलने आणि आनंदोत्सव अशा कार्यक्रमातून विचार जिवंत ठेवला. पहिल्यांदाच नगरसेवक आणि कोणतेही महत्त्वाचे पद भोगलेले नसताना आणि कोणताही अनुभव नसताना पक्षाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याची हिंमत कामठे- शिलवंत जोडीने दाखवली.

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात त्यांनी विशेष लक्ष घातले. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी यशस्वी पार पाडली. आमदार रोहीत पवार यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी संघटनात्मक आणि निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. या निवडणुकीत पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यामुळे पक्षांत ‘इनकमिंग’ वाढले. 

काही दिवसांपूर्वी, राष्ट्रवादी अजित पवार गटातून शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २५ जणांनी पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वी एक गुप्त बैठक झाली. त्यावेळी एक बोलका फोटो प्रसारमाध्यमांसमोर आला. या फोटोमध्ये शरद पवार यांच्या उजव्या बाजुला तुषार कामठे आणि डाव्या बाजुला सुलक्षणा शिलवंत बसलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, शहरातील प्रवेशकर्ती मंडळी किंबहुना २० ते २५ वर्षे राजकारणात असलेली मंडळी टेबलच्या दुसऱ्या बाजुला म्हणजे कामठे-शिलवंत यांच्या समोर बसली होती. शरद पवारांनी आपल्या बाजुला बसण्यासाठी स्थान देत त्यांचे महत्त्व एकप्रकारे अधोरेखित केले. परिणामी, कामठे- शिलवंत  यांचे नेतृत्व शहरातील प्रवेशकर्त्या प्रत्येकाला मान्य करावे लागेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

पिंपरी विधानसभा जिंकण्याची तयारी…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आतापर्यंत झालेले सर्व ‘ग्रँड’ कार्यक्रम पिंपरी विधानसभा मतदार संघात झाले आहेत. नुकतीच झालेली विजयी संकल्प सभा ही पिंपरी मतदार संघातच झाली. त्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल पक्षश्रेष्ठींनी जाहीर सभेत कामठे-शिलवंत यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शहरात अजित पवार  गटाचाही मेळावा झाला. शरद पवार गटाची सभा कोणत्याही बड्या स्थानिक राजकीय नेत्याच्या मदतीशिवाय ‘ओपन ग्राउंड’वर झाली. पण, अजित पवार गटाचा मेळावा हॉलमध्ये घेण्यात आली. दोन्ही सभांचे तुलनात्मक निरीक्षण केले असता, शरद पवार गट सरस ठरला. एका बाजुला  २०-२२ माजी महापौर असेला बलाढ्य गट आणि दुसऱ्या बाजुला तुषार कामठे- सुलक्षणा शिलवंत यांच्यासारख्या मोजक्या लोकांचा गट असे असतानाही शरद पवार पक्षाचा प्रभाव निर्माण करण्यात यश मिळताना दिसते. पक्ष कार्यालय, पक्षाचे ग्रँड कार्यक्रम पाहता पिंपरी विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी सुलक्षणा शिलवंत धर यांनी केल्याचे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button