शिवसेनेकडून निवडणूक लढविणार का? अभिनेता गोविंदा म्हणाला..
![Govinda said that we did not have any discussion about me contesting the elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Govinda-780x470.jpg)
मुंबई | बॉलिवूड अभिनेता गोविंदाने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी त्यांच्यांवर देण्यात आली. गोविंदा आज रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी दाखल झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केलं.
अभिनेता गोविंदा म्हणाले की, आम्ही आज निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करत आहोत. आज रामटेकच्या सभेत सविस्तर बोलेल. ही फक्त सुरुवात आहे. यश हे तुमच्या कर्तव्यावर अवलंबून असते. त्यामुळे मी जे विचार करुन आलो तसे व्हावे, अशी प्रार्थना करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला. आता आम्ही जी सुरुवात केली, याचा डंका जगात वाजेल असा विश्वास आहे. शिवसेनेचा प्रचार हा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात पोहोचेल.
हेही वाचा – ‘नारायण राणे दोन महिन्यांनी तिहार तुरूंगात जातील’; संजय राऊतांचं मोठं विधान
मी निवडणूक लढवावी, यासंदर्भात आमची कोणतीही चर्चा झाली नाही. मी तिकीटदेखील मागितले नाही. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्याबरोबर आहे. त्यांनी दिलेल्या या संधीबद्दल त्यांचे आभार मानतो. मी आतापर्यंत जो निश्चय केला तो पूर्ण झाला. आता मी शिवसेनेच्या प्रचाराला आलो आहे, त्यामुळे शिवसेनेचे उमेदवारी निश्चित विजयी होतील, असं गोविंदाने म्हटले.