‘परत मी शरद पवारांच्या मानगुटीवर..’; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
बारामती मतदारसंघातून ज्याला कुणाला तिकीट मिळेल, तो भाग्यवान असेल
![Gopichand Padalkar said that I went and sat on Sharad Pawar's neck](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/Sharad-pawar-and-Gopichand-padalkar-780x470.jpg)
बारामती : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे बारामतीमधून निवडणूक लढवायलाही उभे राहिले होते. मात्र, तेव्हा त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतरही त्यांनी पवार कुटुंबीयांवर सातत्याने टीका केली. दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा बारामती मतदारसंघ आणि पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे.
बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. बोलावंच लागेल. हर्षवर्धन पाटील इथं आहेत. ते आज आपलं नेतृत्व आहेत. बारामतीच्या लोकसभा मतदारसंघातून पक्ष कुणाला तिकीट देणार हे मला माहिती नाही. पण ज्याला कुणाला तिकीट मिळेल, तो भाग्यवान असेल. कारण पवारांना पाडून संसदेत जाण्याची संधी त्याला मिळणार आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. पडळकरांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाचा उल्लेख केल्यांनी चर्चांना उधान आलं आहे.
बारामतीमधून भाजपाचं तिकीट मिळणारा कोण आहे, मला माहिती नाही. कुणाचं ग्रहमान चांगलं आहे ते मला माहिती नाही. माझं ग्रहमान चांगलं नव्हतं, माझं डिपॉझिट घालवलं. मी असा आहे की भाजपानं मला टार्गेट दिलं आणि तिथं नेऊन बसवलं. परत मी शरद पवारांच्या मानगुटीवर जाऊन बसलो, असं पडळकर म्हणाले.