breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

देवमाणूस! दारूबंदी उठवली म्हणून बार मालकाने केली वडेट्टीवार यांची आरती

मुंबई |

सहा वर्षांनंतर चंद्रपूर जिल्ह्यात मद्यालय सुरू झाली आहेत. दारूविक्री सुरू होताच मद्य विक्रेत्यांनी आपआपल्या पद्धतीने हा आनंद साजरा केला. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूविक्री उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची राहिली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बियर बार मध्ये लावून त्यांची आरती केली.

वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे. श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दारू मुक्ती अभियानाच्या माध्यमातून अ‍ॅड. परोमिता गोस्वामी यांनी या जिल्ह्यात दारूबंदी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली होती. ६ वर्षे दारूबंदी असल्यामुळे दारू विक्रेते अडचणीत होते. दरम्यान त्यांना दिसाला मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दारूबंदी उठवली आहे.

  • “जो आमचं पोट भरतो तोचं आमचा देव”

जिल्ह्यात पुन्हा एकदा अच्छे दिन आले अशी भावना दारू विक्रेत्यांनी बोलून दाखवली आहे. मागील ३ दिवसात मद्यप्रेमींनी तब्बल १ कोटींची दारू रिचवल्याची माहिती आहे, याचाच आनंद म्हणून ग्रीन पार्क बारचे मालक गणेश गोरडवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची आरती केली. जो आमचं पोट भरतो तोचं आमचा देव आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

वडेट्टीवार यांनी दारूविक्रेत्यांच्या जीवनात पुन्हा आनंद भरला आहे, त्यांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही, अशी प्रतिक्रिया गोरडवार यांनी दिली आहे. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button