ताज्या घडामोडीराजकारणविदर्भ

माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पिएवर जीवघेणा हल्ला

ललित अब्बड हल्ल्यातून थोडक्यात बचावले, बीड जिल्ह्यात घटनेने खळबळ

बीड : रात्रीचे नऊ वाजले होते. रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती घराच्या समोर उभी होती. इतक्यात दोनजण दुचाकीवरून आले अन् काही कळण्याच्या आतच त्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने मानेवर सपासप वार केले. मात्र पीडित व्यक्तीने हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याला तितकंस यश आलं नाही. या हल्ल्यात उजव्या हाताच्या मनगटावर मोठी जखम झाली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून माजी मंत्री सुरेश नवले यांचे पिए आहेत. माजी मंत्री सुरेश नवले यांच्या पिएवर जीवघेणा हल्ला झालाय. त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
माजी मंत्री सुरेश नवले यांच्या स्वीयसहाय्यक ललित अब्बड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ललित अब्बड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. दोन अज्ञातांनी ललित अब्बड यांच्यावर हल्ला केला. बीडमधील घटनेने खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून येत दोघांनी ललित अब्बड यांच्यावर हल्ला केला. कोयत्याने त्यांच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून ललित अब्बड थोडक्यात बचावले आहेत.

ललित अब्बड जखमी
माजी मंत्री सुरेश नवले यांचे पीए ललित अब्बड यांच्यावर रात्रीच्या सुमारास कोयत्याने हल्ला करण्यात आला. अज्ञात दोन जणांनी चढविलेल्या हल्ल्यात ललित अब्बड यांच्या हाताला मार लागला आहे. माजी मंत्र्यांना पीएवर हल्ला झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अब्बड यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हल्लेखोरांचा शोध सुरु
ललित अब्बड यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्यानंतर दोघे दुचाकीस्वार घटनास्थळावरून पळून गेले. ललित अब्बज यांना तातडीने बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं ललित अब्बड यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी बीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित अब्बड यांच्यावर कुणी हल्ला केला? याचा पोलीस शोध घेत आहेत. हा हल्ला कुणी केला? यामागचा हेतू काय होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button