breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपचं सरकार, पंतप्रधान मोदी करणार रोड शो

नवी दिल्ली : ओडिशामध्ये भाजपचे पहिल्यांदाच सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १२ जून रोजी होणार आहे. पंतप्रधान मोदी हे देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. भाजपचे ओडिशा प्रभारी विजयपाल सिंह तोमर यांनी सांगितले की, भुवनेश्वरमधील जनता मैदानावर शपथविधी सोहळा होणार आहे. त्याआधी पीएम मोदी भुवनेश्वरमध्ये रोड शो देखील करणार आहेत. भाजपला बहुमत दिल्याबद्दल ते जनतेचे आभार मानणार आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्राबाबू नायडू यांच्या शपथविधीला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम बुधवारी आहे. त्यानंतर पीएम मोदी भुवनेश्वरला जाणार आहेत. या शपथविधी सोहळ्यापासून पीएम मोदींचा रोड शो भुवनेश्वरच्या जयदेव विहार स्क्वेअरपासून सुरू होईल, जो जनता मैदानात संपेल. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा रोड शो असेल. याआधी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी भुवनेश्वरमध्ये रोड शो केला होता.

मोहन चरण माझी हे ओडिशाचे 16 वे मुख्यमंत्री होणार आहेत. माझी हे आदिवासी समाजातून येतात. याशिवाय, दोन उपमुख्यमंत्री देखील असतील. ओडिशाच्या भाजप सरकारमध्ये केव्ही सिंगदेव आणि प्रवती परिदा हे दोन उपमुख्यमंत्री असतील. 53 वर्षीय मोहन माझी हे केओंझार विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री उमेदवार मोहन माझी यांनी बीजू जनता दलाच्या उमेदवार मीना माझी यांचा पराभव केला होता.

ओडिशा विधानसभेत भाजपने 78 जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. मंगळवारी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन मांझी यांची ओडिशाचे पुढील मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. याआधी ओडिशामधील खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांची केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर राज्याचा पुढील मुख्यमंत्री होण्याची त्यांची शक्यता धूसर झाली होती. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानप्रमाणे ओडिशातही भाजपने मुख्यमंत्रीपदी आश्चर्यकारक नावाची निवड केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button