breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणेराजकारणराष्ट्रिय

नवरात्रौत्सवामध्ये उपवास करत आहात का? जाणून घ्या फराळाच्या ५ खमंग रेसिपी

नवरात्रौत्सवामध्ये उपवास करत आहात का? जाणून घ्या फराळाच्या ५ खमंग रेसिपी पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

शारदीय नवरात्रौत्सवास १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या उत्सवाची सर्वजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. नवरात्रौत्सवादरम्यान प्रत्येक दिवशी सकाळी व संध्याकाळी देवीची होणारी पूजा-अर्चना आणि मंदिरातील घंटानादामुळे मन प्रसन्न – आनंदी राहतं. पण करोना व्हायरसच्या संसर्गामुळे यंदा सर्वच सण-समारंभ स्वच्छता तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून साजरे करणं आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे आहे.
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान सर्वोत्कृष्ट डील, HP, Lenovo, MSI, Asus आणि इतर बर्‍याच ब्रँड्सकडून सर्वाधिक विक्री होणारे लॅपटॉप मिळवा.

नवरात्रौत्सव आपल्या देशातील मोठा सण आहे. नवरात्रीचे दिवस अतिशय शुभ मानले जातात. भक्तगण मनोभावे ९ दिवस उपवास ठेवून देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. काही जण केवळ फलाहार करणं पसंत करतात तर काही वेगवेगळ्या फराळाचा आस्वाद घेतात. नवरात्रीच्या उपवासासाठी जाणून घेऊया फराळाच्या या पाच सोप्या पाककृती.

व्रत करणाऱ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे कुट्टूचे पीठ, जाणून घ्या ६ महत्त्वपूर्ण लाभ
कुट्टूची भजी
कुट्टूचे पीठ आणि उकडलेल्या बटाट्यांपासून ही पाककृती तयार केली जाते. झटपट तयार होणारी ही भजी चवीला अतिशय स्वादिष्ट असते.
सामग्री : कुट्टूचे पीठ- २५० ग्रॅम, उकडलेले बटाटे – ४, हिरव्या मिरच्या २, आले, अर्धा चमचा सैंधव मीठ, लिंबू रस – अर्धा चमचा, पाणी – अर्धा कप

विधि :
उकडलेले बटाटे एका बाउलमध्ये मॅश करून घ्या. यानंतर कुट्टूचे पीठ, मॅश केलेले बटाटे, हिरवी मिरची, आले, सैंधव मीठ इत्यादी सर्व सामग्री एका मोठ्या बाउलमध्ये घ्या आणि एकत्र करा.
आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करून पीठ मळून घ्या. लगेचच भजी तळून घ्याव्यात.
कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. थोडे-थोडे मिश्रण तेलात सोडून भजी तळून घ्या.
गरमागरम भजी शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा

​बिटाची कोशिंबीर
बीटरूट कोशिंबीर एक अतिशय चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे. हा पदार्थ तुम्ही नवरात्रीच्या उपवासादरम्यान तसेच अन्य कोणत्याही दिवशी तयार करू शकता. ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी हा एक पौष्टिक पर्याय आहे.

सामग्री : बीट – ४, पुदिन्याची पाने – ५, फ्रेश क्रीम – ८० ग्रॅम, मोहरीची पेस्ट – एक चमचा, बदाम ४, सैंधव मीठ चवीनुसार, चिमूटभर काळी मिरी पावडर, कोथिंबीर

विधि :

बीट उकडून घ्या आणि मध्यम आकारात कापा. पुदिन्याची पाने देखील स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या.
बाउलमध्ये कापलेले बीट, पुदिना, फ्रेश क्रीम, मोहरीची पेस्ट, आणि बदाम एकत्र घ्या व चांगल्या पद्धतीने मिक्स करा.
मिश्रणात मीठ आणि काळी मिरी पावडर देखील मिक्स करावी.
वरून कोथिंबीर टाकून थंडगार सॅलेड सर्व्ह करा.
​बटाट्याची तिखट शंकरपाळी

सामग्री : बटाटे – चार ते पाच, पुदिन्याची पावडर – एक छोटा चमचा, लाल मिरची – आवश्यकतेनुसार, कुट्टूचे पीठ – दोन छोटे चमचे, सैंधव मीठ – चवीनुसार, तळण्यासाठी तेल

विधि :

बटाटे सोला आणि मोठ-मोठ्या आकारात कापून घ्या. कापलेले बटाटे दोन ते तीन वेळा पाण्यातून स्वच्छ धुऊन घ्या.
एक ते दीड तास बटाटे थंड पाण्यामध्ये भिजत ठेवा. यानंतर एका स्वच्छ कापडावर बटाटे पसरून ठेवा.
सुरणाचे काप तळताना ज्याप्रमाणे पीठ लावलं जातं, त्याप्रमाणे बटाट्याला हलक्या स्वरुपात कुट्टूचे पीठ लावा.
आता गरम तेलामध्ये बटाटे फ्राय करून घ्या.
बटाटे तळल्यानंतर वरून मीठ, लाल तिखट, पुदिन्याची पावडर मिक्स करावी.

उपवासाचा बटाट्याचा शिरा हा लोकप्रिय भारतीय गोड पदार्थ आहे.

सामग्री : बटाट – ४ (मध्यम आकाराचे), साखर- १/४ कप, तूप – दोन चमचे, फ्रेश क्रीम दोन चमचे, वेलची पावडर- अर्धा चमचा

विधि :

बटाटे उकडून घ्या आणि चांगल्या पद्धतीने मॅश करा.
एका पॅनमध्ये तूप गरम करा आणि मॅश केलेले बटाटे तुपात परतून घ्या. मध्यम आचेवर बटाटे शिजवून घ्या.
बटाटे शिजल्यानंतर त्यामध्ये साखर आणि क्रीम मिक्स करा. साखर पूर्णतः विरघळेपर्यंत सर्व सामग्री ढवळत राहा.
शिरा तयार झाल्यानंतर वरून वेलची पावडर सोडावी. गरमागरम शिऱ्याचा आस्वाद घ्यावा.
(भूक लागल्यानंतर या ३ सूपचा घेऊ शकता आस्वाद, जाणून घ्या ही माहिती)

​साबुदाण्याचे वडे
सामग्री : साबुदाणे – ५०० ग्रॅम, तेल – अर्धा कप, उकडलेले बटाटे – २, हिरव्या मिरच्या – ३, कोथिंबीर – अर्धा कप, सैंधव मीठ, लाल मिरची पावडर -अर्धा छोटा चमचा, शेंगदाणे -अर्धा कप

विधि : साबुदाणे पाण्यात स्वच्छ धुऊन घ्या आणि दोन ते तीन तास पाण्यात भिजत ठेवा. बटाटे उकडून घ्या. साबुदाणे भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.

एका मोठ्या बाउलमध्ये बटाटे मॅश करून घ्या. त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, सैंधव मीठ आणि भिजलेले साबुदाणे मिक्स करा.
सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्या. वडे तयार करा.
कढईमध्ये तेल गरम करत ठेवा आणि त्यात वडे तळून घ्या.
साबुदाणा वडा तयार झाल्यानंतर शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत गरमागरम सर्व्ह करा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button