breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘कलम ३७० परत आणता येईल, त्यासाठी..’; फारूख अब्दुल्ला यांचं मोठं विधान

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं संविधानातील ‘कलम ३७०’ रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैद्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. यावरून नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी मोठं विधान केलं आहे.

फारूख अब्दुल्ला म्हणाले, याच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश यापूर्वी निकाल दिला होता की कलम ३७० कायमस्वरुपी आहे. पण आता ते रद्द झालंय. आता बघू पुढे काय होतं. विश्वासावर हे जग उभं आहे. हेही दिवस जातील. यांना कलम ३७० हटवण्यासाठी ७० वर्षे लागली. ते परत आणता येईल, कदाचित त्यासाठी आम्हाला २०० वर्षे लागतील.

हेही वाचा  –  ‘राममंदिर उद्ध्वस्त व्हावे हे मुस्लिमांचे मनसुबे’; कालिचरण महाराजांचं वादग्रस्त विधान 

गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत जम्मू-काश्मीर आणि गुजरातची तुलना केली होती. ते भाषण आपण एकदा आठवलं पाहिजे. तेव्हा प्रत्येक गोष्टीत जम्मू-काश्मीर गुजरातपेक्षा वरचढ होतं. तसेच तेव्हा ३७० हे कलम लागू होतं. ते हटवून आता चार वर्षे झाली. आपले सैनिक, अधिकारी मारले जात आहेत आणि हे लोक (भाजपा) तेच जुनं रडगाणं गात आहेत. पंडित नेहरूंवर टीका करत आहेत. हे म्हणतात पंडित नेहरूंनी ७० वर्षांमध्ये काहीच केलं नाही. आज जे चांद्रयान आपण पाठवलंय त्याची सुरुवात कोणी केली? कोणी या सगळ्याचा पाया रचला? अणूऊर्जा कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली? जवाहरलाल नेहरूंनी केली, असंही फारूख अब्दुल्ला म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button