breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘वेश बदलून फडणवीस, शिंदे, पवार यांनी सरकार पाडलं’; संजय राऊतांचा निशाणा

मुंबई : सत्तेत सामिल होण्यापूर्वी अजित पवार यांनी अनेकदा अमित शहा यांची गुप्त भेट घेतली. जवळपास 10 वेळी भेटी झाल्या. मास्क आणि टोपी घालून अजित पवार दिल्लीत जायचे आणि विमानाचं तिकिट बूक करताना देखील ए.ए.पवार या नावाने विमानाचं तिकिट बूक करायचे… असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात रंगमंच, नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राच्या रंगमंचानं अनेक मोठ-मोठे कलाकार दिले आहेत. अगदी बाल गंधर्व यांच्यापासून श्रीराम लागू यांच्यापर्यंत… नाना पाटेकर, प्रशांत दामले यांचं काम देखील आपण पाहतो. अनेक मोठे कलाकार महाराष्ट्राने दिले आहेत. त्या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसत आहे. यांना देखील रंगमंचावर नाटकात सहभागी करून घेतलं पाहिजे.कारण इतक्या उत्तम पद्धतीत ते मेकअप करतात… इतक्या उत्तम पद्धतीने आपले चेहरे बदलतात… इतक्या उत्तम पद्धतीने फिरत्या रंगमंचावर काम करतात.

हेही वाचा –  विधानपरिषदेतील नवनिर्वाचित 11 उमेदवार आज घेणार शपथ

‘अजित पवार यांना पाहा… एखाद्या गुप्तहेराप्रमाणे नाव बदलून, टोप्या बदलून, खोट्या पिळदार मिश्या लावून दिल्लीत अमित शाह यांना भेटायला जात होते. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलत होते लोकं त्यांना ओळखत नव्हते म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला. ही फार मोठी गोष्ट आहे, या राजकारणातल्या कलाकारांनी मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपटाचं फार मोठं नुकसान केलं आहे.’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलंआहे. ‘एकनाथ शिंदे आता सिनेमा काढत आहेत खोट्या कथा लिहुन, त्यांनी स्वतःवर जे नाटक रचलं होतं, त्यांना एखादा नाटक, सिनेमा लिहिता येत नसेल, तर मी उत्तम लेखक आहे. मी लिहितो आणि घडलेले प्रसंग मला त्यांच्यापेक्षा जास्त चांगले माहिती आहेत.

‘एकनाथ शिंदे हे आतापासून वेश बदलून जात नव्हते तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना शिंदे वेश बदलून अहमद पटेलांची भेट घ्यायचे… जेव्हा भाजपचं राज्य नव्हतं काँग्रेसचं राज्य होतं तेव्हा देखील शिंदे अहमद पटेलांना कसे भेटायला जात होते, हे पृथ्वीराज चव्हाण उत्तम प्रकारे सांगू शकतात. अजित पवार देखील उत्तम नट आहेत… असं देखील संजय राऊत अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवीस यांच्यावर निशाणा साधत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button