breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील प्रशस्त विकासकामे म्हणतात ‘हॅप्पी बर्थ डे दादा’…!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिनानिमित्त लक्षवेधी बॅनरबाजी

उद्योजक अभय मांढरे यांच्या संकल्पनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये सुमारे १५० फ्लेक्स

पिंपरी । अधिक दिवे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस गुरूवारी (२२ जुलै) साजरा होत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या समर्थकांनी तुफान बॅनरबाजी केली आहे. यात उद्योजक अभय मांढरे यांनी उभारलेल्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा चांगलीच रंगली आहे.

पवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत अशी अभय मांढरे यांची ओळख आहे. मांढरे हे थेरगाव येथील रहिवाशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन असो किंवा पक्षाचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, युवा नेते पार्थ पवार आदींच्या वाढदिवसानिमित्तही मांढरे आणि मित्र परिवार मोठ्या प्रमाणात जाहिरात करताना दिसतात.

यावर्षी, अभय मांढरे यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांबाबत शहरवासीयांना संदेश दिला आहे. ‘वाढदिवस पिंपरी-चिंचवडच्या शिल्पकाराचा’ अशी थीम घेवून जाहिरात फ्लेक्स बनवण्यात आले आहेत. त्यामध्ये अजित पवार यांच्या कार्यकाळात म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता असताना झालेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत लक्ष वेधण्यात आले आहेत.

‘‘ देशातील सर्वात मोठी बीआरटी म्हणते हॅप्पी बर्थ डे दादा…’’, प्रशस्त ‘‘पाणी पुरवठा योजना म्हणते  हॅप्पी बर्थ डे दादा…,’’ दिमाखदार रस्ते म्हणतात हॅप्पी बर्थ डे दादा…’’ शहराचा सुनियोजित विकास म्हणतो हॅप्पी बर्थ डे दादा…’’ अशी सुमारे १२ ते १५ घोषवाक्यांचे फ्लेक्स तयार केले आहेत.

गेल्या पाव वर्षांत शहर बकाल… पुन्हा दादांच्या ताब्यात द्या..!

याबाबत अभय मांढरे म्हणाले की, पिंपरी-चिंचवडचा प्रत्येक माणूस गेल्या ४ वर्षांत घुसमटला आहे. पिंपरी-चिंचवडकरांना अजितदादांच्या नेतृत्त्वाची कमतरता जाणवत आहे. आम्ही जी संकल्पना घेतली, ती लोकांची भावना आहे. शहरातील नागरिक आता वाट बघीत आहेत. २०१७ मध्ये लोकांनी भाजपाला संधी दिली पण लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. राष्ट्रवादीसह भाजपाच्या काही नगरसेवकांनी माझ्याकडून फ्लेक्सच्या डिझाईन मागून घेतल्या आहेत. अजितदादांचे काम भाजपामधील नगरसेवकांनाही मान्य आहे. गेल्या पाच वर्षांत बकाल झालेले शहर पुन्हा दादांच्या माध्यमातून विकासाला पुन्हा चालना मिळावी, अशी भावनाही अभय मांढरे यांनी ‘महाईन्यूज’शी बोलताना व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button