Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महापालिकांच्या मतदार याद्या जाहीर करण्यास मुदतवाढ

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज झाला असला तरी अनेक महापालिकांच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ संपता संपेना अशी परिस्थिती आहे. महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या तयार होण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास पाच दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला.

महापालिकांच्या मतदार याद्यांचे प्रारूप जाहीर केले आहे. त्यावरील हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ही बुधवारी (१० डिसेंबर) होती. आता ही मुदत १५ डिसेंबर करण्यात आली आहे. मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची मुदत ही २२ डिसेंबर होती. ही मुदत आता २७ डिसेंबर केली आहे. यामुुळेच महानगरपालिका निवडणुकांची घोषणा आता १५ डिसेंबरनंतरच होऊ शकेल.

हेही वाचा –  हार्दिक पाठोपाठ गोलंदाजांचे दमदार प्रदर्शन! भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी दणदणीत विजय

मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत तर १५ ते २० टक्के दुबार नावे असून अन्य महापालिकांमध्येही १० टक्क्यांच्या आसपास दुबार नावे असल्याची बाब समोर आल्यानंतर मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास १० दिवसांची तर हरकती व सूचनांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सात दिवसांची मुदतवाढ दिली होती. ही मुदत बुधवारी संपणार होती. मात्र मतदार याद्या अचूक करण्यास आणखी काही वेळ लागणार असल्याने मुदतवाढ देण्याची मागणी काही महापालिकांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली होती.

नवीन वेळापत्रक

प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर

मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करणे : २० डिसेंबर

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे : २७ डिसेंबर

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button