Chinchwad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाविरोधी कारवाई करणाऱ्या ८ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
![Expulsion of 8 office bearers from Shiv Sena Thackeray group for taking anti-party action](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/uddhav-thackeray-780x470.jpg)
चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, उपशहर प्रमुख नवनाथ तरस यांचा समावेश
पिंपरी : चिंचवड मतदार संघात सुरू असलेल्या पोटनिवडणूकीत शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षविरोधी कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अॅड गौतम चाबूकस्वार यांनी आदेश दिले आहेत.
शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यामध्ये चिंचवड महिला विधानसभा संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पाताई आनपान, उपशहर प्रमुख नवनाथ तरस, विभाग प्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ, गणेश आहेर, पिंपरी विधानसभा समन्वयक रवी घटकर यांचा समावेश आहे.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांना शिवसेना ठाकरे गट पक्षाने महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे. काही पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे गौतम चाबूकस्वार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.