breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“हर्बल टोबॅकोच्या अती सेवनाने नवाब मलिक यांच्या मेंदूवर परिणाम झालाय, त्यामुळेच ते…”

मुंबई |

राज्यातील द्राक्ष बागायतदार तसेच वाइन उद्योगास चालना देण्यासाठी सुपर मार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाइन विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयावरुन मागील काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असणारा भाजपा असा वाद निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे हा वाद सुरु असतानाच दुसरीकडे भाजपाबरोबरच विविध स्तरांतून होणाऱ्या विरोधाला न जुमानता बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वाइन विक्रीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र याचवेळी नवाब मलिक यांनी सर्वाधिक दारु पिणारे लोक हे भाजपामध्ये असल्याची टीका केल्याने यातून नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मलिक यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्या मेंदूवर हर्बल टोबॅकोचा परिणाम झाल्याने ते अशी वक्तव्य करत असल्याचा टोला लगावला आहे.

  • नवाब मलिक काय म्हणाले होते?

“वाइन विक्रीचा निर्णय सरकारने मागील आठवड्यामध्ये घेतला. शिवराज सरकारने (मध्य प्रदेश), हिमाचल सरकारने, गोवा सरकारने हाच निर्णय घेतला होता की नाही हे त्यांनी सांगावं,” अशी मागणी नवाब मलिक यांनी बुधवारी भाजपावर टीका करताना केली. तसेच पुढे बोलताना, “वाइन विक्रीच्या निर्णयाचा विरोध होतोय. भाजपा विरोध करतेय. त्यांच्या नेत्यांचे दारु निर्मितीचे कारखाने, त्याचे परवाने भाजपाचे नेते सरेंडर करणार का हा प्रश्न त्यांना आम्ही विचारु इच्छितो,” असंही मलिक म्हणाले होते.

  • दारु पिणार नाही अशी शपथ भाजपाच्या नेत्यांनी घ्यावी

“(भाजपाचे) अनेक नेते मद्यनिर्मिती उद्योगामध्ये आहेत. अनेक नेत्यांची वाइन विक्री आणि मद्यविक्रीची दुकानं आहेत. काही लोकांचे बार आहेत. सर्वात जास्त दारू पिणारे लोक हे भाजपात आहेत. त्यांची तर एक नेता सांगतेय की थोडी थोडी पित जा,” असंही मलिक म्हणाले होते. तसेच त्यांनी, “कधी तुम्ही हे सारे परवाने सरेंडर करणार हे भाजपाने सांगावं तसेच आजपासून आम्ही दारु पिणार नाही अशी शपथ भाजपाच्या नेत्यांनी घ्यावी,” अशी मागणीही केली होती.

  • हर्बल टोबॅकोचा परिणाम झालाय…

आर्यन खान प्रकरणापासून नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये वाद सुरु असून आता मलिक यांनी केलेल्या या टीकेच्या पार्श्वभूमीवर कंबोज यांनी टीका केलीय. “हर्बल टोबॅकोचा वापर एखाद्या व्यक्तीने रोज केला, त्यातही सकाळ संध्याकाळी केला तर त्या व्यक्तीच्या मानसिक संतुलनावर परिणाम होतो. ज्या प्रकारचं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलंय ते रोज हर्बल टोबॅको वापरुन झालेल्या परिणामामुळे झालंय,” असं कंबोज यांनी म्हटलंय.

  • “ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवतायत”

“रोज ते (नवाब मलिक) हर्बल टोबॅकोचा वापर करत असल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झालाय. या अती वापराने त्यांच्या मेंदूमधील नसांना नुकसान झालं आहे. त्यामुळेच ते या पद्धतीच्या फालतू गोष्टी बोललेत. अशी वक्तव्य एखादा संतुलन बिघडेलेला व्यक्तीच करु शकतो,” अशी टीका कंबोज यांनी केलीय. “ज्यांचा स्वत:चा जावई आणि घरातील व्यक्तींचा गांजा प्रकरणाशी संबंध आहे. गांजा विक्री, तस्करीशी ज्यांच्या नातेवाईकांचा संबंध आहे ते काय दुसऱ्यांकडे बोटं दाखवत आहेत,” असंही कंबोज म्हणालेत.

  • आधी स्वत:कडे पाहा

“आज वाइनच्या विक्रीसंदर्भात जो निर्णय तुम्ही घेतलाय त्यामधून काही लोकांना फायदा होणार आहे. हे भ्रष्टाचाराने बरबटलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्राला बेवडा बनवण्याचं धोरण तुमचं सरकार घेऊन आलंय. महाराष्ट्रातून याला विरोध होऊ लागला तर तुम्ही भाजपाला बेवडा म्हणालात. मिया नवाब तुम्ही आधी स्वत:कडे पाहा. कोण गर्दुला आहे, कोण ड्रग्ज विक्री करणाऱ्याचे प्रवक्ते आहे, कोणाचं कनेक्शन आहे याची उत्तरं द्या,” अशी मागणीही कंबोज यांनी केलीय.

  • माफी मागा…

“भाजपाच्या लोकांना बेवडा वगैरे बोलणं तुम्हाला शोभत नाही. तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांच्या प्रकरणांकडे पाहा. आम्ही कपडे उतरवायला सुरुवात केली तर तुम्हाला उत्तरं देता येणार नाहीत. मी तुमच्या या वक्तव्याचा निषेध करतो. तुम्ही यासंदर्भात माफी मागितली पाहिजे,” असंही कंबोज म्हणालेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button