Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण
निवडणूक आयोगाने KYC अॅप केले लाँच; मतदाराला मिळणार उमेदवाराची संपूर्ण माहिती
![Election Commission launches KYC app](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Loksabha-Election-2024-780x470.jpg)
Lok Sabha Elections 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने KYC अॅप लाँच केले आहे. या अॅपमुळे खासदारकीला उभ्या राहिलेल्या उमेदवारांवर गुन्हे आहेत की नाहीत याची माहिती मतदारांना मिळणार आहे. हे ॲप खास मतदारांसाठी तयार करण्यात आले आहे.
लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची पार्श्वभूमी नागरिक तपासू शकणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे.
हेही वाचा – लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३२ हजार फलक हटविले
निवडणूक आयोगाचे केवायसी ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युझर्ससाठी तयार करण्यात आले आहे. निवडणुकीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी हे ॲप महत्त्वाचे ठरणार आहे. या अॅपच्या माध्यमातून उमेदवाराची छोटी- मोठी सर्व माहिती मिळणार आहे.