breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक 27 फेब्रुवारीला; निवडणूक आयोगाची घोषणा

27 फेब्रवारीला मतदान तर 2 मार्चला निकाल

पुणे : पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघआच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 फेब्रुवारी 2023 ला ही पोटनिवडणुक होणार आहे. सोबतच त्रिपुरात १६ फेब्रुवारीला आणि नागालँड मेघालय या राज्यांमध्ये २७ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होतील, अशी घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदाक मुक्ता टिळक यांचं काही महिन्यापुर्वी निधन झालं. तर पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतच निधन झालं. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे.

असा असणार निवडणूक कार्यक्रम :

31 जानेवारी 2023 रोजी उमेदवारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

04 फेब्रुवारी 2023 अर्ज भरण्याची शेवटची मुदत

08 फेब्रुवारी 2023 अर्जांची छाननी

10 फेब्रुवारी 2023 अर्ज परत घेण्याती तारीख

27 फेब्रुवारी 2023 मतदान पार पडेल

02 मार्च 2023 मतमोजणी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button