एकनाथ शिंदे सरकारने 8 महिन्यांत प्रसिद्धीवर खर्च केले 42 कोटी रुपये…
![Eknath Shinde government spent Rs 42 crore on publicity in 8 months…](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Eknath-Shinde-2-700x470.jpg)
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून आठ महिन्यांत जाहिरातींवर 42 कोटींहून अधिक रक्कम सरकारी तिजोरीतून खर्च करण्यात आली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन जाधव यांनी सरकारकडे तपशील मागितला होता. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने माहिती अधिकाराला उत्तर देताना जाधव यांना सांगितले की, राज्यात शिंदे सरकार आल्यापासून सरकारी जाहिरातींवर 42 कोटी 44 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत प्रत्येक घरात तिरंगा मोहीम, केंद्र सरकारचा पुढाकार म्हणून बूस्टर डोस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा होणार सेवा सप्ताह, मराठी भाषा दिन, जी-20 कार्यक्रम, इंडियन सायन्स काँग्रेसने राज्यस्तरीय रोजगार मेळावा, एमएमआरडीए, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती आदींशी संबंधित जाहिरातींवर ७ महिन्यांत ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केले आहेत.