breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर ईडीची पुन्हा छापेमारी

गेल्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई

कागल : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानावर ईडीकडून आज सकाळी पुन्हा छापेमारी सुरू केली आहे. माहितीनुसार, आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना प्रकरणात ईडीची ही छापेमारी सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

कागल येथील घरावर ईडीनं पुन्हा धाड टाकली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरी चार ते पाच अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालं आहे. ईडीनं गेल्या दोन ते तीन महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. कागलमधील मुश्रीफ यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले आहेत. दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या फेर लेखापरिक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे ईडीचं पथक पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरी दाखल झालं आहे.

दीड महिन्यात दुसऱ्यांदा कारवाई केली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक आहेत. त्यामुळे कागलमध्ये वातावरण बनले तणावपूर्ण बनले आहे. शुक्रवारी उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांना दिलासा दिला होता तर शनिवारी कारवाई झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यापूर्वीही ईडीने हसन मुश्रीफांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापेमारी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा ईडीने याठिकाणी छापे टाकले आहेत. दरम्यान सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब पाटील साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता. यासंदर्भात ईडीनं यापूर्वी चौकशी केली होती. आता ईडीकडून धाडसत्र सुरु करण्यात आलं आहे.

आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात पारदर्शक पद्धतीने व्यवहार होत नाहीत. तरीही २०२० साली तो ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. असे असूनही या कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button