breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय

दहा कोटींची ड्रेनेज लाइन, तरीही मैलापाणी ओढ्यात!

ड्रेनेज लाइन राजकीय श्रेय लाटण्यासाठी टाकण्यात आली का? नागरिकांचा सवाल

(पुणे ) कात्रज । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

गुजर-निंबाळकरवाडी ओढ्यात ड्रेनेजची लाइन सोडण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे या ओढ्यालगत पाच-सात फुटावरून 10 कोटी रुपयांची ड्रेनेज लाइन गेलेली असताना मुख्य लाइन ही वाहिनी जोडण्याचेही काम अद्यापही ड्रेनेज विभागाकडून झाले नाही. त्यामुळे मुख्य ड्रेनेज लाइन राजकीय श्रेय लाटण्यासाठी टाकण्यात आली का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

निंबाळकरवस्ती, गुजरवस्ती परिसरात नागरिक राहतात. परिसरातील ओढ्यात ड्रेनेजची लाइन सोडण्यात आल्याने मैलायुक्त पाणी नैसर्गिक प्रवाह असलेल्या ओढ्यातून वाहत आहे. यामुळे ओढ्याच्या भागात डास, माशा यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच ओढ्यालगत राहणार्‍या नागरिकांना, तसेच रस्त्याने जाणार्‍या पादचार्‍यांना या पाण्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

या भागातील लहान-मुले व नागरिक आजारी पडत असून, त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, याकडे ड्रेनेज विभागाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मांगडेवाडी व भिलारेवाडी भागातदेखील अनेक ठिकाणी उपवाहिन्या न जोडल्याने मैलायुक्त पाणी ओढ्यातून वाहत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसून येत आहे. या संदर्भात ड्रेनेज विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वाती बिराजदार यांच्याशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

कात्रज तलावात येणारे मैलायुक्त पाणी रोखण्यासाठी गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी गावांसाठी 10 कोटींची ड्रेनेज लाइनचे काम गेल्या काळात हाती घेण्यात आले होते. या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्नही राजकीय नेत्यांकडून झाला . मात्र, मुख्य ड्रेनेज लाइन काम पूर्ण होऊन उपवाहिन्या या वाहिनीला न जोडल्याने ड्रेनेजचे पाणी ओढ्यातून वाहतच आहे. त्यामुळे मुख्य ड्रेनेज लाइन तलाव व ओढे मैलायुक्त पाणी मुक्त करण्यासाठी केली की, राजकीय श्रेयवादासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button