डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरात थांबूनच अभिवादन करा…- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
![Dr. Greet Babasaheb Ambedkar while staying at home ...- Commissioner of Police Krishna Prakash](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/SP-KrishnPrakash.jpg)
- सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करा- पोलीस आयुक्त…
पिंपरी |
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरात थांबूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुधवारी (दि. १४) जयंती साजरी होत आहे. जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायी मोठ्या संख्येने घराबाहेर पडतात. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील कोरोनाची लाट असल्याने जयंती साजरी करण्यावर शासनाने निर्बंध घातले आहेत.
कृष्ण प्रकाश म्हणाले, कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे. प्रत्येकाने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून प्रशासनास सहकार्य करावे. घरात थांबूनच महामानवाला अभिवादन करावे. प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून गर्दी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.