TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांकडून फेरीवाले, व्यावसायिकांना प्रचारपत्रकांचे वाटप

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मतदारसंघाच्या विविध भागातील फेरीवाले, दुकानदार, किरकोळ व्यावसायिक आदींना कलाटे यांच्या प्रचार पत्रकांचे वाटप केले. तसेच मतदानाच्या दिवशी (ता. २६) मतदान यंत्रावरील शिट्टीचे बटण दाबून राहुल कलाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन कार्यकर्ते करीत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मतदारांना स्लीपाही वाटल्या. भर उन्हामध्ये नागरिकही थांबून कार्यकर्ते करीत असलेले आवाहन ऐकत होते. सकाळपासूनच कार्यकर्ते प्रचारासाठी बाहेर पडले होते. भाजी विक्रेते, फळविक्रेते, छोटे- मोठे व्यावसायिक यांच्या भेटी-गाठी घेत या सर्वांना मतदान यंत्रावरील शिट्टीचे बटण दाबण्याचे आवाहन कार्यकर्ते संबंधित व्यावसायिकांना करीत होते.

काहीजण एकमेकांमध्ये राहुल कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची चर्चा करताना कोपऱ्या- कोपऱ्यावर दिसत होते. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी राहुल कलाटे यांचे छायाचित्र असलेली टोपी टी-शर्ट अंगात घातले होते. काही फेरीविक्रेत्यांना मतदानाविषयी माहिती नव्हती, अशा लोकांना माहिती देण्याचे काम कार्यकर्ते करीत होते. राहुल कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची पावती आमदारकीच्या रूपाने त्यांना मिळण्याची वेळ आता आल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
राहुल कलाटे यांच्या प्रचार पत्रकांचे घरोघरी वाटप
राहुल कलाटे यांच्या प्रचारपत्रकांचे घरोघरी वाटप करण्यात आले. सकाळपासूनच मतदारसंघाच्या विविध भागात युवक-युवतींनी कामाला सुरुवात केली. कार्यकर्ते नागरिकांना कलाटे यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देत होते. नागरिकही प्रचारपत्रकातील विविध विकासकामांची छायाचित्रांसह दिलेली माहिती आवर्जून वाचताना दिसत होते. यावेळी रविवारी (ता. २६) शिट्टीचे बटण दाबून राहुल कलाटे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही तरुण-तरुणी करीत होते. काही यवक-युवतींनी मतदारांना स्लीपा वाटल्या. त्याचप्रमाणे ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातुनही आक्रमक प्रचार करण्यात आला. राहुल कलाटे यांचे छायाचित्र आणि शिट्टीचे चित्र असलेले टी-शर्ट आणि टोपी घालण्याची तरुणाईमध्ये ‘क्रेझ’ होती.
राहुल कलाटे यांची थेरगावातून दमदार पदयात्रा

फुलांच्या पाकळ्यांची होणारी उधळण , ढोल-ताशांचा गजर आणि रंगीबेरंगी शिट्ट्यांच्या आवाजाचा दणदणाट अशा दमदार वातावरणात राहुल कलाटे सायंकाळी थेरगाव परिसरातून भव्य पदयात्रा काढली. पदयात्रेची सुरवात गणेशनगर येथून झाली. त्यानंतर शिव कॉलनी, मंगलनगर, गुजर नगर, जय भवानी नगर, पडवळ नगर, पवार नगर, शिवतीर्थ नगर, अशोका सोसायटी, ड्रायव्हर कॉलनी, जयमल्हार नगर, कैलास नगर, थेरगाव गावठाण, जगताप नगर, दगडू पाटील नगर, वनदेव नगर या भागातून गेल्यावर दत्त नगर या भागात सांगता झाली. पदयात्रे दरम्यान राहुल कलाटे यांच्यावर ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. पदयात्रा जसजशी पुढे सरकत होती तसतसे आणखीन कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी होत होते. एकी हेच बळ’, ‘ संधी देऊ सक्षम नेतृत्वाला, साथ देऊ राहुल दादांना’, अशा घोषणा लिहिलेले फलक महिलांनी हातात घेतलेले होते. ‘ शिट्टी वाजली की इतिहास घडणार आहे. या शिट्टीचा आवाज विधानसभेत जायला हवा ‘, अशा घोषणा रिक्षातून देण्यात येत होत्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button