देवेंद्र फडणवीसांचा झंझावात ! 52 दिवसांत 115 सभा, तर माध्यमांना 67 मुलाखती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/www.mahaenews.com-8-1-780x470.jpg)
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराचा झंझावात केला. 26 मार्चपासून त्यांनी पहिल्या सभेला प्रारंभ केला आणि आज 18 मे रोजी राज्यातील पाचव्या टप्प्याचा प्रचार संपुष्टात आला, तेव्हा भिवंडीत त्यांनी 115 व्या सभेला संबोधित केले.
देवेंद्र फडणवीस यांनी 26 मार्च रोजी चंद्रपुरातून पहिल्या सभेचा प्रारंभ केला. सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची ही सभा होती. यानंतर 50वी सभा ही नांदेड उत्तरमध्ये येथे 22 एप्रिल रोजी झाली.
हेही वाचा – ‘मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, पुढच्या 6 महिन्यात पीओके भारतात असेल’; योगी
1 ते 50 सभांचे अंतर पार करायला फडणवीसांना 26 दिवस लागले. त्यानंतर 100 वी सभा शिवाजीनगर पुणे येथे 11 मे रोजी झाली. विशेष म्हणजे 51 ते 100 या पुढच्या 50 सभा अवघ्या फडणवीस यांनी 15 दिवसांत केल्या. यानंतर भिंवडीत झालेली सभा ही समारोपाची 115वी सभा ठरली.
पहिली सभा ते आजची शेवटची सभा असे सलग एकूण 52 दिवस हा प्रचारसभांचा क्रम सुरू होता. या 52 दिवसांत 115 सभा करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी विविध माध्यमांना एकूण 67 मुलाखती दिल्या.
यात 35 मुलाखती या मुद्रीत माध्यमांना, 22 मुलाखती या इलेक्ट्रॉनिक माध्यमांना तर 8 मुलाखती या डिजिटल माध्यमांना होत्या. 2 मुलाखती या राष्ट्रीय साप्ताहिकांना होत्या.