breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

‘जे रामाची गोष्ट करतील तेच देशावर राज्य करतील’; देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी राम मंदिराच्या निर्माणाची पाहणी देखील केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर धन्य झालो. राम मंदिराचे निर्माण होत असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ याचे आभार मानतो. तसेच, देशात फक्त रामराज्यच चालणार आणि रामाला मानणारेच देशावर राज्य करणार.

राम भक्त एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. जे रामाच्या अस्तिवत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जन्माचे पुरावे मागत होते, ते घरी बसले आहेत. आता महाराष्ट्रात रामाला मानणारे सरकार स्थापन झाले आहे. ही रामाची आणि हनुमानाची महिमा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हनुमान चालीसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा, रवी राणा यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरूंगात टाकले. हे पाप करणारे रावण की राम आहेत, हे सांगा. साधुंचे हत्याकांड झाले तेव्हा हे तोंड उघडले नाही. आम्ही साधूंचे रक्षण करणारे आहोत. महाराष्ट्रात प्रभू रामांच्या आशीर्वादाने बनलेलं सरकार काम करणार आहे, असा विश्वास देतो. असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button