पुण्यात भाजपा महाबैठकीत बूथ सशक्तीकरणाचा निर्धार!
शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची वज्रमूठ; संघटनात्मक बांधणीवर भाजपचा भर
![Determination of booth empowerment in BJP general meeting in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Pune-BJP-780x470.jpg)
पुणे : भारतीय जनता पार्टी, पुणे शहराची बैठक प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे आणि पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाली. दरम्यान वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिशादर्शक असे मार्गदर्शन केले.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ सक्षमीकरण, केंद्र आणि राज्य पातळीवरील पार्टीचे कार्यक्रम प्रभावी राबविणे अशा विविध विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार भिमराव तापकीर,उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, प्रभारी धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे , सरचिटणीस गणेश गोष, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, दीपक नागपुरे, संदिप लोणकर, तसेच इतर पदाधिकारी, मा. नगरसेवक, बूथ प्रमुख यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
राज्यातील महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस पुण्यात जातीने लक्ष घालणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेत 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणण्याचे लक्ष ठेवण्याचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. तर पक्षाची संघटनात्मक ताकद कशी वाढेल यावर प्रत्येक कार्यकर्त्याने लक्ष देण्याच्या सूचना देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी या बैठकीत दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.