breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या?”; भाजपा नेत्याचा सूचक इशारा

मुंबई |

भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. महिनाभरातच महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. या राजीनाम्यानंतर आता भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. देशमुख यांचा राजीनामा ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो… होता है क्या?, म्हणत महाजन यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय. महाजन यांनी ट्विटरवरुन अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. महाजन यांनी एकूण पाच ट्विट केली आहे. “राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?,” असं महाजन यांनी आपल्या पहिल्याच ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार..

आगे आगे देखो…होता है क्या? #टार्गेट१००करोड #AnilDeshmukh @AnilDeshmukhNCP

— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021

पुढच्याच ट्विटमध्ये देशमुख यांना न्यायालयाच्या आदेशामुळे नाचक्की झाल्याने राजीनामा द्यावा लागल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे. इतकच नाही तर त्यांनी ठाकरे सरकारचा उल्लेख वसुली सरकार असाही केलाय. “उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला आहे.
कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील ह्या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे,” असं महाजन म्हणालेत.

उच्च न्यायालयाने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिल्यामुळे सरकारची नाचक्की होऊन देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला आहे.
कोरोनाचे संकट असून देखील राज्यातील ह्या सरकारला जनतेचे काही देणेघेणे नाहीये, हे फक्त वसुली सरकार आहे.

— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021

पुढील ट्विटमध्ये देशमुख यांनी आधीच राजीनामा द्यायला हवा होता असंही महानज म्हणालेत. “एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती,” असं महाजन म्हणाले.

एका एपीआयला १०० कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती.

— Girish Mahajan (@girishdmahajan) April 6, 2021

वाचा- छत्तीसगड नक्षलवादी हल्ला, बेपत्ता कोब्रा कमांडोचं नक्षलवाद्यांकडून अपहरण?

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button