breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येला रवाना

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. आता देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते सुद्दा अयोध्येत दाखल होतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. अयोध्या हा आमचा आस्थेचा विषय आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्येत जाणार असल्याने या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button