अनधिकृत मशिदीच्या विरोधात आवाज उठवल्या प्रकरणी मनसे नेत्याला जीवे मारण्याची धमकी
हम उसे जिंदा नाही छोडेंगे..हम उसे ढुंढ के मारेंगे..
![Death threat to Maharashtra Navnirman Sena leader Avinash Jadhav](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/raj-thackeray-and-avinash-jadhav-780x470.jpg)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांनी ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातला धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ‘हम उसे जिंदा नाही छोडेंगे..कोई गुस्ताख छुप न पाएगा..हम उसे ढुंढ के मारेंगे..’ अशा आशयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी.. बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओत धमक्या देणारी व्यक्ती दिसत नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाडवा मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशिद, मजार आणि दर्गाची उभारणीकडे सरकारचे लक्ष विधले. यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा परिसरातील डोंगरावर वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवर अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. प्रशासन व वनविभागाने पाहणी करत चौकशी सुरू केली होती.