Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, ८ डिसेंबरपासून नागपुरात राजकीय रणधुमाळी

नागपुर : महाराष्ट्र विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली असून, हे अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे. विधानभवन सचिवालयाने अधिवेशनाच्या तयारीसाठी पाठवलेल्या पत्रात या तारखेचा उल्लेख केला आहे.
अधिवेशन ८ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत पार पडेल, ज्यामध्ये एकूण दहा दिवसांचे कामकाज प्रस्तावित आहे. सचिवालयाने नागपूर विधानभवनातील संबंधित अधिकाऱ्यांना तयारी सुरू करण्याच्या सूचना दिल्यामुळे प्रशासकीय पातळीवर आता लगबग सुरू झाली आहे.





