पिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन, शिवरक्त प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव

  • बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ विशेष आकर्षण

। पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

आमदार महेशदादा लांडगे युवा मंच, श्री. निलेशदादा नेवाळे सोशल फाउंडेशन आणि शिवरक्त प्रतिष्ठान यांच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ विशेष आकर्षण असणार आहे. चिखली घरकुल येथे सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनच्या वतीने केले आहे.

कोरोना संकटाचे सावट असल्याने गेले २ वर्षे सर्वच उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. यंदा मात्र शिंदे-फडणवीस सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. . २ वर्षानंंंतर दहीहंडी उत्सव मुक्तपणे साजरा करता येणार असल्याने राज्यभरात सर्व आयोजकांनी यंदा दहीहंडी उत्सवाचे भव्य प्रमाणात आयोजन केले आहे.

मुख्य संयोजक निलेश नेवाळे याबाबत म्हणाले, यंदा राज्य सरकारने उत्सव निर्बंधमुक्त केले असल्याने उत्सव आयोजकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा केवळ उत्सव नाही तर एक सामाजिक चळवळ आहे. या उत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक गोविंदा पथके सहभागी होतात . या दहीहंडी पथकाच्या माध्यमातून वर्षभर लोकांची सेवा होत असते, जी बक्षिसे मिळतात त्यातून सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम वर्षभर होतात, त्यामुळे दहीहंडी पथकांना बक्षिसे देऊन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button