‘शरद पवारांनी आता रिटायर व्हावं’; सायरस पुनावाला यांचा सल्ला, राजकीय चर्चांना उधाण!
मुंबई : अजित पवार यांनी काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, शरद पवार यांना रिटायर होण्याचा सल्ला सीरम इन्स्टिट्यूटचे व्यस्थापकीय संचालक सायरल पुनावाला यांनी दिला आहे.
सायरस पुनावाला आणि शरद पवार यांची मैत्री सर्वांच्या परिचयाची आहे. सायरस पुनावाला हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जातात. दरम्यान त्यांनी शरद पवार यांना मोठा राजकीय सल्ला दिला आहे. शरद पवारांकडे दोनदा पंतप्रधान होण्याची संधी होती, पण त्यांनी त्या संधी गमावल्या. ते अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची चांगली सेवा केली असती. पंरतु त्यांच्या हातातून संधी निघून गेली. आता जसं माझं वय वाढतंय तसचं त्यांचही वाढतंय, त्यामुळे त्यांनी आता निवृत्त व्हावं, असं सायरल पुनावाला म्हणाले.
हेही वाचा – रक्षाबंधनला खान सरांचा वर्ल्ड रेकॉर्ड? तब्बल ७००० बहिणींनी बांधली राखी
दरम्यान, अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार यांना निवृत्तीचा सल्ला दिला होता. परंतु त्यावेळी शरद पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. उगाच माझ्या वयाच्या गोष्टी करु नका, वयाचा उल्लेख केला तर महागात पडेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.