breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

आमदार लांडगेंना शुभेच्छा देण्यासाठी रायगड ते भोसरी सायकल प्रवास!

  •  प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले यांचे १५६ किलोमीटर सायकलींग
  •  गावजत्रा मैदानावर मॅकमोहन यांचे भोसरीकरांनी केले स्वागत

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमधील तरुणाईमध्ये ‘क्रेझ’ असलेल्या आमदार महेश लांडगे यांचा ‘फॅन फॉलोअर्स’ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही वाढला आहे. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशी प्रस्तरारोहक (क्लांयंबर) तथा गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी सुधागड-रायगड ते भोसरी असा सुमारे १५६ किलोमीटरचा सायकलवर करून आमदार लांडगे यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस अभिचिंतन सोहळा भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर शनिवारी सांयकाळी पार पडला. पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण येथील लांडगे यांचे हितचिंतक याठिकाणी जमले होते.

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या डिझास्टर मॅनेजमेंट फेडरेशनशी संबंधित असलेले प्रस्तरारोहक व गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी यावर्षी आमदार लांडगे यांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड ते भोसरी सायकल प्रवास करण्याचा संकल्प केला होता.

कामगार नेते सचिन लांडगे, डिझास्टर मॅनेजमेंट फेडरेशनचे संतोश शेलार आणि अविरत श्रमदान व सायकल मित्र, पुणे च्या सदस्यांनी मॅकमोहन यांचे गावजत्रा मैदानावर स्वागत केले.
विशेष म्हणजे, गावजत्रा मैदानावर आयोजित केलेल्या अभिष्ठचिंत सोहळ्यात आमदार महेश लांडगे यांना महाराष्ट्रातील सर्वांत मोठी पगडी घालून शुभेच्छा देण्यात आल्या. काही ठिकाणी गाय-वासरुही भेट देण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतकांनी हटके शुभेच्छा दिल्यामुळे आमदार लांडगे यांच्या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली आहे.

  • श्री. बल्लाळेश्वराच्या शुभेच्छा गिर्यारोहक मॅकमोहन घेवून आलो : मॅकमोहन

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील नैसर्गिक संकटाच्या काळात डिझास्टर मॅनेजमेंट फेडरेशनच्या माध्यमातून आमदार लांडगे यांच्यासोबत काम करण्याचा योग आला. तसेच, कोविड काळात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही आम्ही आमदार लांडगे यांच्या सामाजिक मदत कार्यात सोबत होतो. त्यामुळे लोकांसाठी आपुलकीने काम करणाऱ्या या नेत्याबाबत माझ्या मनात आदराचे स्थान आहे. मी पाली, ता. सुधागड येथे राहतो. त्यामुळे श्री. बल्लाळेश्वरांच्या शुभेच्छा मी दादांसाठी घेवून आलो आहे. त्यांना निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना मी श्री. बल्लाळेश्वाराकडे केली आहे, अशा भावना प्रस्तरारोहक तथा गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी व्यक्त केल्या.

  • महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजा भवानीलाही तोरण…

भोसरीतील सामाजिक कार्यकर्त्या किर्ती मारुती जाधव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या चरणी १११ नारळांचे तोरण अर्पण केले आहे. तसेच, दूग्धाभिषेक करुन साडी-चोळीने ओटी भरली आहे. आमदार लांडगे यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करीत जाधव कुटुंबियांनी उस्मानाबाद येथील येडाई म्हणजेच श्री. येडेश्वरी माता देवी मंदिरात ५१ नारळांचे तोरण अर्पण केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button