#Covid-19: BMC उभारणार हवेतून प्राणवायूची निर्मिती करणारे प्रकल्प
![# Covid-19: BMC to build oxygen-to-air projects](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/oxygen.jpg)
मुंबई |
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. यासाठी राज्यांनी केंद्राकडे मदतीचा हात मागितला आहे. प्राणवायू तुटवड्याचं संकट पाहता मुंबई महानगरपालिकेनं वातावरणातील हवेतून प्राणवायू तयार करण्याऱ्या प्रकल्पांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची उभारणी लवकरच केली जाईल असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच एका महिन्यात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत. या १६ प्रकल्पातून प्रतिदिन ४३ मेट्रिक टन प्राणवायू मिळणार आहे. या प्रकल्पांचं आयुर्मान किमान १६ वर्षे असणार आहे. त्यामुळे प्राणवायूसाठी अवलंबून राहण्याची गरज कमी होईल असं माहिपालिकेकडून देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची निर्मिती केली जाणार आहे.
वातावरणातील हवेतून होणार प्राणवायू निर्मिती!
शहरात प्राणवायू पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता १२ रुग्णालयांमध्ये एकूण १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.#NaToCorona
(१/२) pic.twitter.com/PF8B2c6CUS
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
वाचा- #Coronavirus: बैठक सुरु असतानाच नरेंद्र मोदींनी अरविंद केजरीवालांना फटकारलं; म्हणाले…