breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

#Covid-19: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला कोरोनाची लागण

मुंबई: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यासह लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अशातच काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील हे मागील आठवड्यात गुरुवारी एक दिवस मुंबईत होते.

पाटील यांनी राज्यातील काँग्रेस वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतलेली होती. या बैठकीला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख यांच्यासह अनेकजण या मिटींग उपस्थितीत देखील होते. त्यानंतर एच.के.पाटील यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यात आलेली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्यामुळे पाटील यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना खबरदारी घेण्याचा सल्ला दिलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button