breaking-newsताज्या घडामोडीराजकारण
#CoronaVirus | रामदास आठवलेंनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक
मुंबई | ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘करोना’ व्हायरसच्या संकटाच्या काळात चांगले काम करत आहेत. मुंबई व महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सातत्यानं प्रयत्न करत आहेत. लोकांना काळजी घेण्याच्या सूचना देत आहेत. त्यांचे मी आभार मानतो,’ अशा शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
पुण्यात शनिवारी रात्री उशिरा एका ज्येष्ठ नागरिकासह रविवारी दिवसभरात आणखी तीन अशा चार जणांना ‘करोना’ची लागण झाल्याचे निदान झाले आहे. त्यामध्ये बारामती शहरातील एका चाळीस वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे.
पुणे शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली असून, पिंपरी-चिंचवडमध्ये ‘करोना’चे बारा रुग्ण आढळले आहेत.